पुट्टू
१०-१०-२००० इडप्पल
मुंबईपेक्षां गरम हवा इ. एवंगुणविशिष्ट इडप्पल गांवाचे वर्णन भाग क्र. ४ मध्ये आलेले आहे त्यामुळे द्विरुक्ती करीत नाही. त्या नीरस गावात पुन्हा काय पाहायचे म्हणून फारशा अपेक्षा न ठेवता संध्याकाळी एक आंघोळ टाकून फेरफटका मारला. तरी वेफर्सचे दुकान दिसल्यावर नार्याची भरपूर खेचली. पूर्वी खाल्लेल्या उपाहारगृहातच पोटोबा केला. तो गरगरीत मालक आम्ही पुन्हा आलेले पाहून खूष. सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले. या वेळी मात्र गरमागरम तिखट सांबार आणि भाताचा समाचार घेतला. सोबत थंड चपात्या आणि अवियल होते.
दुसरे दिवशीं सकाळी सातला शुचिर्भूत झालों आणि गाडीत पेट्रोल, हवा वगैरे भरून तयार झालो. बिल मिळताच निघालो. रस्त्यात कोठेतरी खायचे ठरले. कुठल्या हॉटेलात जायचे ते सांग असे देवाने सांगितले. तासादीडतासाने जाड्याला भूक लागली. देवा चाकावर, गाडी सुसाट. जाड्यानें हॉटेल दाखवले की हा हळूच वेग वाढवी. हॉटेल पट्कन मागे जाई. तू हॉटेल दिसले की लगेच दाखवत नाहीस, मागे गेल्यावर दाखवतोस असा देवाने आरोप केला. अर्थातच आम्ही इतरांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचे भुकेनें कासावीस होणे पाहून आमची करमणूक. मग हॉटेल दाखवले की दुसरा कोणीतरी हे नको, फालतू आहे पुढचे पाहूं म्हणे मग हा त्याच्यावर रागवे आणि वाद घाले. इतर आणखी चेकाळत. अर्धाएक तास असे त्याला पिडल्यावर कन्नोरच्या आसपास कुठेतरी वळणामुळे वेग कमी झाल्यावर एका हॉटेलाबाहेर पार्किंगला बर्यापैकी जागा दिसली म्हणून थांबलो.
हॉटेल धड स्वच्छ नाहीं तर धड कळकटहि नाही. हॉटेलात फक्त आम्हीच. ताबडतोब पाचसहा वेटर्सनी आम्हांला वेढले. इडली नाही, सांबार नाही, चटणी नाही, अप्पम नाही, इडीअप्पम नाही, फक्त पुट्टू, कसलासा रस्सा आणि ऑम्लेट वगळून इतर मांसाहारी पदार्थ. म्हणजे चिकन रस्सा आणि मटन रस्सा. पुट्टू म्हणजे काय हे खाणाखुणा करून विचारले. उभ्या ग्लासासारखा ग्लासाएवढाच एक पांढरा दंडगोल दाखवला. कणीपेक्षा किंचित बारीक पण रव्यापेक्षां किचित जाड कणांचा बनलेला. एक खाऊन बघू म्हणून एकाने पुट्टू आण म्हणताच प्रत्येका समोर पुट्टू आणून आदळला. देवाने, जाड्याने आणि शेवडेने त्वरित परत पाठवला. दोन पुट्टू पाचजण सहज उडवू, आवडला तर पुन्हा मागवता येईल या अपेक्षेने मी आणि नार्याने राहूं दिला. वातड मटणासारखा टणक आणि चिवट, त्यातून थंडगार, कसलीहि चव नाही. संगमरवर भिजवून शिजवून मऊ करून आणले होते बहुधा. बरोबर चटणी वा सांबारासारखे काहीहि नाही. चमत्कारिक चवीचा बिनतिखट रस्सा. तोहि थंडगार. आम्ही दोन घास घाल्ल्यावर तिसरा खाऊ शकलो नाही. देवा शेवडे तर एका घासावर थांबले. जाड्याने चिकन मसाला आणि पाव मागवला. त्याच्या प्लेटमध्ये थंड रश्शात प्रचंड आकाराचा कोंबडीचा पाय होता. गिधाड खातोस म्हणून आम्ही त्याला भरपूर चिडवले. पण त्यानें आमच्याकडे दुर्लक्ष करून नेटाने ते संपवले. नार्याने पावाच्या छोट्या तुकड्याबरोबर चव घेऊन पाहिली आणि फालतू घाण काहीतरी मागवतो म्हणून जाड्याच्या बेचाळीस पिढ्यांचा यथेच्छ उद्धार केला. त्याला पाण्याच्या बाटलीचे चौदा रुपये अजिबात देऊ नकोस म्हणून मास्तराने आगीत तेल ओतायचें पवित्र कार्य केलें. जेवणांतून विषबाधा होऊन सोळा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू अशी ठळक बातमीहि मी प्रदीप भिडेच्या आवाजात काल्पनिक दूरदर्शनवर वाचली. मध्येच मी घूऽऽऽ कुच कुच कुच कुच असा आवाजहि काढला. कसला आवाज म्हणून कोणीतरी विचारले. जाड्याच्या पोटातून गिधाड ओरडले म्हणून मी जाहीर केले. गिधाड कसे ओरडते हे कोणाला ठाऊक होते? पण त्या गंमतीजंमती मुळे फारच मजा आली. अन्यथा न्याहारीचे तीनतेरा वाजलेच होते. अजूनहि आम्ही कधी कधी एकमेकांना पुट्टू खायला घालीन अशी धमकी देतो. रात्रीं बैकमपाडीला ‘हॉटेल बालाजी’ मध्ये थांबून यथेच्छ भोजन करायचे असे ताबडतोब ठरले.
कासारगोडच्या आसपास कुठेंतरी एक टायर पंक्चर झाला. मेस्त्री चला, कामाला लागा म्हटल्यावर मी लगेच कामाला लागलो. हातोडी, पान्हे वगैरे चालवण्यात आमच्यात मी किंचित कमी डावा. उजवा नक्कीच म्हणता येणार नाही. जरी डावखुरा नसलो तरी. दहा मिनिटात टायर बदलून निघालो. वाटेंत पंक्चरदेखील काढले आणि ठरल्याप्रमाणे चारसाडेचारच्या सुमाराला बैकमपाडीला पोहोचलो. दोन दिवसांचे कपडे धुतले आणि मस्त झोप काढली. चित्रवाणीवर आय सी सी नॉक आऊट क्रिकेट मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान चालू होती. ती पाहिली. झहीरखानची सुंदर गोलंदाजी पाहिली. कपिल देव, श्रीनाथनंतर भारताला चांगला वेगवान गोलंदाज मिळाला आणि आपण जिंकलो देखील या आनंदात जेवण जास्त स्वादिष्ट लागले. पोटोबा झाल्यावर शतपावली करून झोंपलो. दुसर्या दिवशी सातलाच निघायचे होते तरच संध्याकाळपर्यंत गोव्याला पोहोचणार. परवा तसेच सकाळी गोव्याहून निघून संध्याकाळी पुणे गाठायचा विचार होता.

No comments:
Post a Comment