कोट्टायम आणि एर्नाकुलम
कोट्टायम ०८-१०-२०००.
नार्याच्या घरची आघाडी ठीक होती.
मस्त थंड पाण्याचा शॉवर घेऊन फिरायला बाहेर पडलो. कोट्टायम शहर स्वच्छ आहे. कोठेहि पानाचे ठेले नाहीत, प्रशस्त नसले तरी साधारण रूंदीचे डांबरी गुळगुळीत रस्ते, चांगले चारपाच कि.मी. पायी फिरलो. कोठे खणलेले नाही, कचरा कोठे दिसला नाही, दुकाने सुबक, स्वच्छ आणि आकर्षक. मालाने खचाखच भरलेली व समृद्ध. खाण्याची हॉटेले पण शेट्टी लोकांच्या हॉटेलासारखी स्वच्छ. इथेहि इडप्पलसारखेच थंड खाणे इतर टेबलावर लोकांच्या पुढ्यात दिसत होते. तशीच दोन प्रकारची हॉटेले. शाकाहारी व मांसाहारी. तसेच दर. मांसाहारी हॉटेलांत - बहुधा ख्रिस्ती बंधूंची असावीत - स्वस्त दरातले बीफ उपलब्ध. मग इतर ठिकाणी खाण्यापेक्षा डायनिंग हॉलमध्ये खायचे ठरवले. निदान त्या शेफला तरी चवीतले थोडेफार कळत असेल. दालफ्राय, तंदुरी रोटी, छोले, जिरा राईस झकास. मुख्य म्हणजे गरमागरम. उर्दूवाचनहि स्वस्त नाही तरी बरे होते. पाच जणांनी पोटभर खाऊन पाचशेसाडेपाचशे रु. झाले. जेवल्यावर शतपावलीखातर थोडे फिरून परत आलो. साडेसहाला चहा आणि बिल मिळेल म्हणाले. आम्हांला तरी यापेक्षां जास्त काय हवे होते?
कोट्टायम दि. ०९-१०-२०००
आता परतीचे वेध लागले होते. मोरपीस अलगद पुस्तकाच्या पानांत ठेवावे तशा मधुर आठवणी आठवणीच्या कप्प्यात ठेवत होतो. खेळण्याच्या दुकानात लहान मूल जावे आणि हे घेऊ कीं ते घेऊ असा त्याला प्रश्न पडावा असे आम्हाला सगळ्यांना झाले होते. मडिकेरी जास्त छान की कोडाई? प्रत्येक ठिकाण वेगळे आणि अतुलनीय. प्रत्येक ठिकाणचा स्मृतिगंध वेगळा आणि हवाहवासा वाटणारा. मनस्थिति इतकी उत्कट होती की न्याहारी केली की नाही हे देखील आता आठवत नाही.
आता परतीच्या वाटेवरले कोचीन/एर्नाकुलम तेवढे पाहायचे होते. हायवेने रस्ता कापीत होतो. तीच ऊष्ण व दमट हवा. तीच केरळ स्पेशल रहदारी. तेच मागून वाजणारे बसचे कर्कश भोंगे, आपल्या पुढे जाऊन त्या अवजड बसेस तश्शाच करकचून ब्रेक दाबून थांबत होत्या. पण त्या उत्फुल्ल मनस्थितीत काहीच खुपेनासे झाले. प्रसन्न आठवणी मनांत रुंजी घालत होत्या. मागचे तिघेहि अंतर्मुख. बोलणे जवळजवळ नाहीच. ड्रायव्हर किलींडरच काय ते बोलत होते. म्हणजे ड्रायव्हर विचारत होता व किलींडर उत्तर देत होता. त्रिचूर किती कि.मी.? कोचीन किती? वगैरे वगैरे.
माध्यान्हीच्या सुमाराला कोचीन आले. किती वाजले होते आता लक्षात नाही. पण कडक ऊन आणि प्रचंड गरम हवा ४० अंश सेल्शिअस अंदाजे. तपमापक अर्थातच आपली त्वचा आणि तिला जोडलेला मेंदू. चायनीज फिशिंग नेट्स पाहिली. तिथे आपल्यासमोर मासे पकडून किनार्यावर ठेवलेल्या कोळशाच्या शेगडीवर आपल्यासमोरच भाजून (सपाट तव्यावर तेलात भाजणे = शॅलो फ्राय) देतात. जाड्याच्या मत्स्यप्रेमाला पान्हा फुटला नसता तरच नवल. छान आहे म्हणून खाल्ला. मास्तरांनीं फक्त चव पाहिली. नार्याने तेहि धैर्य केले नाही. मनासारखा प्रवास घडल्यानें सगळे तृप्त होतों. हवाहि गरम होती. इतर कोणी खायच्या मूडमध्यें नव्हतेच. आता तिथले प्राचीन सिनेगॉग पाहायचे होते.
सिनेगॉगमध्यें पाऊल टाकले आणि एकदम स्थळकाळाच्या सीमा ओलांडल्या. कुठेतरी मध्यपूर्वेत अरबस्तानांत सीरीया, ईजिप्त वगैरे देश चित्रवाणीवर पाहिले होते तिथे पोहोचलो. शेदोनशे वर्षापूर्वींच्या काळात गेलो. एका रखरखीत बोळात वसलेले ते सिनेगॉग. आजूबाजूला एकहि झाड नाहीं. वर तळपते ऊन. रस्याकडेला उघडे नाले. रस्त्याकडेच्या खांबावर उघड्या तारा. टेलिफोनच्या आणि विजेच्या पण. जुन्या वाड्यात असते तसे दगडी फरशी बसवलेले आवार. आवाराला तिन्ही बाजूंना भिंत. मागची बाजू पाहिली नाही. भिंतीतच बसवलेला लाकडी दरवाजा. बोळ जसा किरकोळ तशी वाडासदृश इमारतहि किरकोळ, फाटकहि किरकोळच. भव्यतेचा मागमूस नाही. पनवेल, पुणे, वाई, इथले वाडे होते तशी इमारत. फाटकापसून अदमासे दहापंधरा फुटांवर मुख्य इमारत. आवारात झाडेझुडुपे होती की नाही आता आठवत नाही. फोटो काढावेसे वाटले नाहीतच. धर्मासंबंधी असल्यामुळें असेल. स्थापना इ.स. १५६८ - कोरलेलें होते. आम्हाला वाटले होते शेदोनशे वर्षे मागे गेलो. हे तर चांगले चारशे साडेचारशे वर्षे जुने होते.
आत गेल्यावर माहीमच्या ‘श्री’ सिनेमात वा गिरगावजवळच्या ऑपेरा हाऊसमध्यें गेल्यासारखे वाटले. (टंकता टंकता आठवण झाली, या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रपटांच्या तिकिटचे दर उलट होते. म्हणजे पुढचे तिकीट महाग आणि दूरचे व बाल्कनीचे स्वस्त. नाटकाच्या थिएटरची परंपरा म्हणून.) परंतु स्थापत्य पूर्णपणे वेगळे आणि अपरिचित. आपल्याला हेमाडपंती मंदिरे, दाक्षिणात्य स्थापत्याची देवालये, रोमन आणि गॉथिक शैलीतील इमारती, चर्चेस पाहायची सवय आहे. ही स्थापत्यशैली पूर्णपणें अपरिचित. आकर्षक नाहीच. स्थापत्याच्या ज्ञानाची तशी माझ्याकडे बोंबच. सिनेगॉग मी तरी पहिल्यांदाच पाहात होतो. वाईटहि नाही. खाली साधारण फरशी, नीट आठवत नाही पण बहुधा बुद्धिबळाच्यापटाप्रमाणे मांडून बसवलेल्या काळ्या व पांढर्या लाद्या असाव्यात. छतावर झुंबरे, एका बाजूला एक लाकडी सज्जा ऊर्फ बाल्कनी. विविध प्रकारचे दिवे, हंड्या. काही पितळेच्या चकचकीत वस्तू. आता फारसे काही आठवत नाही. मला स्वारस्य नसल्याचा परिणाम असावा. माझा नेहमी हवेत रहाणारा रथहि जमिनीवर येऊन बहुधा चाकहि रुतले होते. वाचकहो क्षमस्व. पाहायला आलेले प्रवासी तुरळकच. आमच्याव्यतिरिक्त जेमतेम दहापंधरा असतील. बाहेर पडतांना टेबलावर माहितीपुस्तके विकायला ठेवली होती. ज्यू धर्माचे काहीच ठाऊक नाही म्हणून एक पुस्तिका घेतली. त्यांच्या देवाला येहोवा म्हणतात असे नंतर कधीतरी ऐकले. आत्ता इतक्या वर्षांनी ती पुस्तिका शोधून काढली. व्यवस्थित जपून ठेवल्यामुळे पट्कन सापडली. लिहायसाठी त्यात काही माहिती मिळते का पाहायला. कोणा एकाने पी एच डी करतांना प्रबंधासाठी माहिती जमवली. त्यातलीच थोडी छापली आहे. आकर्षक असे त्या पुस्तिकेत काही नाही. वास्तविक शाळेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात विजयनगर, फत्तेपूर सिक्री, पेशवाईतले पुणे इ. वर्णनें फार मनोरंजक रीतीने लिहिली आहेत. या पुस्तिकेतील वर्णन मात्र इतके नीरस आहे - निदान मला तरी वाटले - की बोलून सोय नाही किंवा सोलून बोय नाही. पाऊणेक तासात बाहेर पडलो. पण आयुष्यात एखादे तरी सिनेगॉग पाहायचेच होते. चर्चेस मशिदी पाहिल्या आहेत. मग सिनेगॉग का नको? स्तूप, विहारहि कधीतरी पाहाणार आहे.
निघालो एकदांचे. हुश्श केले. गाडी चालायला लागली की बरे वाटते. पुढे येणारे गाव कसे असेल याचे कुतूहल पुढच्या क्षणाची अनिवार ओढ घेऊन येतें. आयुष्य कसे छान प्रवाही वाटते. मागील मधुर क्षणांच्या हळुवार स्मृतींच्या धुक्यातून पुढें येणार्या नव्या क्षणाचे अज्ञात रंग मस्त गहिरे होतात. मन पुढे येणार्या ताज्या क्षणाच्या स्वागतासाठी एकदम टवटवीत होऊन जाते.
आता संध्याकाळ होइस्तोवर पुढे जायचे आणि चारनंतर बरेसे हॉटेल पाहून मुक्काम ठोकायचा असा विचार होता. रा. म. मा. १७ नेंच पुढें जात राहिलो. चवक्कड गेल्यानंतर अचानक काम चालू रस्ता बंद चे एक डायव्हर्शन आले. पुढचे मार्गदर्शक गाव होते पोन्नान्नी. आश्चर्य म्हणजे हा रस्ता चांगल्या अवस्थेत आणि कमी रहदारीचा होता. मार्गदर्शक दगड मात्र नव्हते. दिवस किंचित कलला होता म्हणून सूर्य डावीकडे ठेवून उत्तरेच्या दिशेने जात होतो. मास्तरांनी नकाशा काढला. त्यात हा रस्ता दिसत होता. पण हाय रे दुर्दैवा. मास्तरांचा चष्मा बॅगेत राहिला. दिशादर्शकाचे काम माझ्याकडे. एक नाका आला. रस्त्याला चार फाटे फुटत होते. एक समोर किंचित उजवीकडे बाकीचे तीन तीन कोनांतून डावीकडे. नकाशांत तीनच फाटे. सर्वात डावीकडचा फाटा किंचित मागच्या बाजूला जाणारा. हा बहुधा समुद्रकिनारी जात असावा. डावीकडून दुसरा फाटा रा. म. मा. १७ ला मिळायला हरकत नसावी. तो फाटा पकडला. १० किमी. गेले, वीस गेले, रा. म. मा काही दिसेना. रस्त्याला दगड दिसेना. मधूनच गाववजा शहर लागे. सगळ्या पाट्यांवर जिलेबी. कुणाला विचारावे तर कुणालाहि इंग्रजी वा हिंदी येत नाहीं. एकदोनदा कोझोकोडे व्हेअर असे विचारले. पण फोल. एकानें एक दिशा दाखवली. लगेच पूल लागला. दोन रुपये टोल भरला. पलीकडे गेलो. पुन्हा एकाला विचारले. त्याला इंग्रजी येत होते. त्यानें पुन्हां पूल ओलांडून परत जाऊन फर्स्ट लेफ्ट सांगितलें. पुन्हा २ रू. टोल भरून पहिल्या रस्त्याला लागलों. एन एच सेव्हन्टीन पण कोणाला कळत नव्हते. संध्याकाळ होऊ लागली. पुढच्या नाक्यानंतर अचानक रस्ता व परिसर ओळखीचा दिसायला लागला. आणि पाचहि जणानी सुस्कारा सोडला. हे जाताना लागलेले इडप्पल होते. पुन्हा हॉटेल बॉम्बे. लग्नाच्या सभागृहाला लागून असलेले. सुदैवाने लग्नकार्य नव्हते व सभागृह रिकामेच होते त्यामुळे हॉटेल मिळाले.

No comments:
Post a Comment